Monday, January 10, 2011

मला कायम वाटत ,तू जवळ असावीस जवळ....

मला कायम वाटत ,तू जवळ असावीस जवळ ,
पहिल्या पावसात भिजताना
पहिल्या मातीचा गंध अलगद मनात शिरताना

मला कायम वाटत ,तू जवळ असावीस जवळ ,
रातराणी खुलताना ,
गंध त्याचा अलगद रोमारोमात भिनताना

मला कायम वाटत ,तू जवळ असावीस जवळ
प्राजक्त उमलताना ,
त्याचा नीरव पाउस अंगावर घेताना

मला कायम वाटत ,तू जवळ असावीस जवळ..............

No comments: