Saturday, October 27, 2012

बालपणी चा काळ सुखाचा.....

काल जुने फोटो बघत होतो . लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या . त्यातलाच एक हा फोटो .साधारण  पणे मी एक दीड वर्षाचा असेन... निखिलच्या पहिल्या वाढदिवसाचा ....कल्याणच्या गोळे वाड्यात ...
या फोटो मध्ये आम्ही ५ भावंड आहोत... जितेंद्र , मी ,राहुल (आजीच्या कुशीत ) अमित आणि निखील (आजोबांच्या कडे  )



हा दुसरा फोटो , साधारण आम्ही २ वर्षाचे असताना काढला ... मी ,निखील आणि राहुल ...

काळ पुढे सरकतो .. सर्व संदर्भ बदलतात .. नाती बदलतात. पण असे फोटोच मदत करतात .. जुन्या आठवणी जागवायला

खरच .....खूपच सुखद आठवणी आहेत या .... जपून ठेवल्या पाहिजेत अशा .....

सलील




आपले छंद ........

आपण छोटे असताना आपल्याला काही न काही जमवण्याचे छंद असतात . त्यापैकी एक म्हणजे काडेपेट्या जमवणे . मी सुद्धा त्याला अपवाद नाही. मी जमवलेल्या काही काडेपेट्यांचे हे फोटो ......

आपला अभिप्राय जरूर कळवा.....

सलील